मना सर्वदा सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८॥
सज्जनांच्या योगाने क्रिया पालटते आणि भक्तीच्या अर्थाला लागते. क्रियेवाचून वाचाळपणा निवतो. वादसंवाद तुटला की तो हित करतो.
- समर्थ रामदास