मनाचे श्लोक

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा

मनाचे श्लोक १०९.

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगीं तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९॥

वादवेवाद सोडून सुखाने संवाद करावा. शोक आणि संताप हरणारा तोच आहे. वादसंवाद तुटला की तो हित करतो.

- समर्थ रामदास