मनाचे श्लोक

जनीं सर्वसूखी असा कोण आहे

मनाचे श्लोक ११.

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे ॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥ ११॥

जगात सर्वसुखी कोण आहे, हे मनाला विचार करून शोधावे. पूर्वी जे संचित केले, त्यासारखे भोगणे प्राप्त झाले आहे.

- समर्थ रामदास