मनाचे श्लोक

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला

मनाचे श्लोक ११२.

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२॥

सांगता सांगता आणि ऐकता ऐकता जन्म गेला, तरी वादवेवाद तसाच ठेला. संशय आणि दंभी वाद उठतो. तुटलेला वादसंवाद हित करतो.

- समर्थ रामदास