मनाचे श्लोक

जनी हीत पंडीत सांडीत गेले

मनाचे श्लोक ११३.

जनी हीत पंडीत सांडीत गेले ।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे ॥ ११३॥

हित सांगणारे पंडित सोडून गेले, आणि अहंतेने ब्रह्मराक्षस झाले. त्याहून व्युत्पन्न कोण आहे. मना, सर्व जाणीव सोडून राहा.

- समर्थ रामदास