मनाचे श्लोक

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे

मनाचे श्लोक ११४.

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे ॥ ११४॥

फुकट मुखाने बोलता काय वेंचे. दिवसेंदिवस आत गर्व खरा होतो. क्रियेवाचून वाचाळपणा व्यर्थ आहे. विचाराने तू स्वतःला शोधून पहा.

- समर्थ रामदास