मनाचे श्लोक

तुटे वाद संवाद तेथें करावा

मनाचे श्लोक ११५.

तुटे वाद संवाद तेथें करावा ।
विविके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५॥

वादसंवाद तुटतो तिथे करावा. विवेकाने अहंभाव पालटावा. बोलण्यासारखे आचरण करावे. क्रिया पालटली की भक्तीच्या पंथाने जावे.

- समर्थ रामदास