मनाचे श्लोक

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे

मनाचे श्लोक ११७.

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे ।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७॥

ध्रुव लेकरू बापुडे दीन होते. कृपा भाकता भेट दिली. तारांगणात प्रेमखाण चिरंजीव आहे. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास