मनाचे श्लोक

अजामेळ पापी तया अंत आला

मनाचे श्लोक ११९.

अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९॥

अजामेळ पापीचा अंत आला, आणि कृपाळूपणाने त्याला मुक्त केले. चक्रपाणी अनाथांचा आधार आहे. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास