मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥ १२॥
मनात दुःख आणू नये. शोक आणि चिंता नको. विवेकाने देहबुद्धी सोडावी, आणि विदेहीपणाने मुक्ती भोगत जावी.
- समर्थ रामदास