मनाचे श्लोक

विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं

मनाचे श्लोक १२०.

विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं ।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी ।
जना रक्षणाकारणे नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२०॥

विधीसाठी मत्स्य झाला, कूर्मरूपाने पृथ्वी पाठीवर धरली, आणि जनांच्या रक्षणासाठी नीच योनी घेतली. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास