महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१॥
महाभक्त प्रल्हादाला कष्टवले, म्हणून त्यासाठी सिंह झाला. ज्वाळ विशाळ सान्निध्य कोणाला येत नाही. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास