मनाचे श्लोक

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी

मनाचे श्लोक १२२.

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तया कारणें वामनू चक्रपाणी ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२॥

कृपा भाकता वज्रपाणी झाला, त्यासाठी वामन चक्रपाणी झाला, आणि द्विजांसाठी भार्गव चापपाणी झाला. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.

- समर्थ रामदास