तये द्रौपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें ॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४॥
द्रौपदीसाठी वेगाने लागला, मागे सारे सोडून त्वरेने धावला. कलीसाठी बौद्ध मौनी झाला आहे. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास