अनाथां दिनांकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५॥
अनाथ आणि दीनांसाठी जन्म घेतो. पुढे कलंकी देव होणार आहे. वेदवाणी त्याचे वर्णन करता थकते. देव भक्ताभिमानी कधी उपेक्षत नाही.
- समर्थ रामदास