मनाचे श्लोक

जनांकारणे देव लीलावतारी

मनाचे श्लोक १२६.

जनांकारणे देव लीलावतारी ।
बहुतांपरी आदरें वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६॥

जनांसाठी देव लीलावतार घेतो, आणि आदराने वेष धारण करतो. पापरूपी जन त्याला जाणत नाहीत. ते दुरात्मे, नष्ट आणि चांडाळ पापी आहेत.

- समर्थ रामदास