मनाचे श्लोक

जगीं धन्य तो रामसूखें निवाला

मनाचे श्लोक १२७.

जगीं धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपीं बुडाली ॥ १२७॥

जो रामसुखाने निवतो, कथा ऐकता तल्लीन होतो, रामबोधाने देहभावना उडते, आणि मनोवासना रामरूपात बुडते, तो जगात धन्य आहे.

- समर्थ रामदास