मनाचे श्लोक

मना सांग पां रावणा काय जाले

मनाचे श्लोक १३.

मना सांग पां रावणा काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३॥

रावणाचे राज्य अकस्मात बुडाले, हे मनाला आठवायला सांगितले आहे. त्यामुळे वासना लवकर सोडावी. काळ पाठलाग करत आहे.

- समर्थ रामदास