विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरें शोधल्यावीण बोलो नको हो ।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२॥
विचारून बोलावे, विवंचून चालावे. त्याच्या संगतीने संतप्तही निवतात. शोधल्यावाचून बोलू नको. चालणे शुद्ध आणि नेमस्त राहो.
- समर्थ रामदास