नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा ।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४॥
अंगी गर्व नाही, नेहमी वीतरागी आहे. क्षमा, शांति आणि दया भोगतो. लोभ, क्षोभ आणि दैन्य नाही. या लक्षणांनी योगिराणा जाणावा.
- समर्थ रामदास