मनाचे श्लोक

धरीं रे मना संगती सज्जनाची

मनाचे श्लोक १३५.

धरीं रे मना संगती सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५॥

सज्जनांची संगती धर. त्यामुळे दुर्जनाची वृत्ती पालटते. भावाने सद्बुद्धी सन्मार्गाला लागते. क्रूर आणि विक्राळ काळ भंगतो.

- समर्थ रामदास