जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना ।
जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३७॥
जिवांना श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, तरी जीव अज्ञानात तसेच राहिले. देहबुद्धीचे खोटे कर्म टळत नाही. जुने ठेवणे मीपणाने आकळत नाही.
- समर्थ रामदास