भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८॥
भ्रमाने नाडलेले वित्त गुप्त झाले. जीवाचे जन्मदारिद्र्य ठाकून आले आहे. देहबुद्धीचा निश्चय न टळल्याने जुने ठेवणे मीपणाने आकळत नाही.
- समर्थ रामदास