मनाचे श्लोक

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला

मनाचे श्लोक १४.

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४॥

कर्मयोगाने जन्म झाला, तरी शेवटी काळाच्या मुखात निमले. थोर लोकही मृत्युपंथाने गेले. किती जन्मले आणि किती मेले, याची गणती नाही.

- समर्थ रामदास