मनाचे श्लोक

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं

मनाचे श्लोक १४०.

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं ।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४०॥

जे त्याचे होते ते चुकले, प्राप्त झाले नाही. गुणाने गोवले जाऊन देहाला दुःख झाले. गुणावेगळी वृत्ती वळत नाही. जुने ठेवणे मीपणाने आकळत नाही.

- समर्थ रामदास