म्हणे दास सायास त्याचे करावे ।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना ।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना ॥ १४१॥
दास म्हणतो, त्याचा सायास करावा, आणि जाणत्याचे पाय धरावे. गुरु आणि अंजन वाचून ते आकळत नाही. जुने ठेवणे मीपणाने कळत नाही.
- समर्थ रामदास