मनाचे श्लोक

कळेना कळेना कळेना कळेना

मनाचे श्लोक १४२.

कळेना कळेना कळेना कळेना ।
ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना ।
बळें आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२॥

कळत नाही, संशय ढळत नाही, अहंता गळत नाही, आणि बळानेही मिळत नाही. हे आकळण्याचे दुःख येथे सांगितले आहे.

- समर्थ रामदास