मनाचे श्लोक

अविद्यागुणे मानवा उमजेना

मनाचे श्लोक १४३.

अविद्यागुणे मानवा उमजेना ।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना ॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें ।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ॥ १४३॥

अविद्येने माणसाला उमजत नाही. भ्रमाने हित चुकले, ते आकळत नाही. परीक्षेवाचून नाणे दृढ बांधले आहे. सत्य आणि मिथ्या कोण जाणेल.

- समर्थ रामदास