मनाचे श्लोक

जगी पाहतां साच ते काय आहे

मनाचे श्लोक १४४.

जगी पाहतां साच ते काय आहे ।
अती आदरे सत्य शोधुन पाहे ॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४॥

जगात खरे काय आहे, हे आदराने शोधून पाहा. पुढे पाहता पाहता देव जोडतो. भ्रम, भ्रांती आणि अज्ञान सारे मोडते.

- समर्थ रामदास