मनाचे श्लोक

फुटेना तुटेना चळेना ढळेना

मनाचे श्लोक १४७.

फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचले मीपणे ते कळेना ॥
तया एकरूपासि दूजे न साहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहें ॥ १४७॥

फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. मीपणाने संचलेले ते कळत नाही. त्या एकरूपाला दुजे साजत नाही. मना, संत अनंत शोधून पहा.

- समर्थ रामदास