मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५॥
ही मृत्युभूमी सत्य आहे. जगत असताना सारे मी मी म्हणतात, आणि चिरंजीव मानतात. अकस्मात सारे सोडून जातात.
- समर्थ रामदास