मनाचे श्लोक

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही

मनाचे श्लोक १५०.

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही ।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १५०॥

पीत नाही, श्वेत नाही, श्याम नाही, व्यक्त नाही, अव्यक्त नाही, नीळ नाही. दास म्हणतो, विश्वास धरला की मुक्ती लागते. मना, संत अनंत शोधून पहा.

- समर्थ रामदास