मनाचे श्लोक

खरें शोधितां शोधितां शोधिताहे

मनाचे श्लोक १५१.

खरें शोधितां शोधितां शोधिताहे ।
मना बोधिता बोधिता बोधिताहे ॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥ १५१॥

खरे शोधता शोधता शोधत आहे, आणि बोधता बोधता बोधत आहे. सज्जनांच्या योगाने, अनुरागाने, चांगला निश्चय पावला जातो.

- समर्थ रामदास