नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने ॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥ १५३॥
पिंडज्ञानाने नाही, तत्त्वज्ञानाने नाही, तानमानाने नाही, योगयागाने नाही, भोगत्यागाने नाही. समाधान सज्जनांच्या योगाने होते.
- समर्थ रामदास