दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे ।
बरे पाहता गूज तेथेचि आहे ॥
करी घेउ जाता कदा आढळेना ।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५॥
जगात दिसत नाही तेच शोधून पाहा. चांगले पाहता गुज तेथेच आहे. घेऊन जाताना कधी आढळत नाही. सारे कोंदाटले आहे, ते कळत नाही.
- समर्थ रामदास