म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षितां वेगळे राहवेना ॥ १५६॥
जाणता म्हणणारा जगात मूर्ख दिसतो. अतर्काचा तर्क कोण करणार. मीपणाने पाहता दिसत नाही. लक्ष दिले की वेगळे राहत नाही.
- समर्थ रामदास