जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥ १५९॥
ज्याने जाणिवेची माशी खाल्ली, त्याला भोजनाची रुची कशी. ज्याच्या मनातील अहंभाव विरत नाही, त्याच्या पोटात ज्ञानाचे अन्न जिरत नाही.
- समर्थ रामदास