मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६॥
एक मेला की दुसरा शोक वाहतो, आणि तोही पुढे जात असतो. लोभ आणि क्षोभ पुरत नाही, म्हणून पुन्हा जन्म घेतला जातो.
- समर्थ रामदास