मनाचे श्लोक

नको रे मना वाद हा खेदकारी

मनाचे श्लोक १६०.

नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नानाविकारी ॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ १६०॥

वाद खेद करतो, भेद नाना विकार करतो. पुढील लोकांना शिकवू नको, जोवर अहंभाव तुझ्यापाशी राहिला आहे.

- समर्थ रामदास