देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला ।
देहातीत ते हीत सांडीत गेला ॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३॥
देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, आणि देहातीत हित सोडून गेला. देहबुद्धी आत्मबुद्धी करावी. सज्जनांची संगती नेहमी धरावी.
- समर्थ रामदास