मनें कल्पिला वीषयो सोडवावा ।
मनें देव निर्गूण तो ओळखावा ॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४॥
मनाने कल्पिलेले विषय सोडवावे. मनाने निर्गुण देव ओळखावा. कल्पिलेली कल्पना सरावी. सज्जनांची संगती नेहमी धरावी.
- समर्थ रामदास