मनाचे श्लोक

बरा निश्चयो शाश्वताचा करावा

मनाचे श्लोक १६७.

बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥
घडीने घडी सार्थकाची धरावी ।
सदा संगती सज्जनांची धरावी ॥ १६७॥

शाश्वताचा चांगला निश्चय करावा. दास म्हणतो, संदेह विसरावा. घडीघडी सार्थक धरावी. सज्जनांची संगती नेहमी धरावी.

- समर्थ रामदास