मनाचे श्लोक

करी वृत्ती जो संत तो संत जाणा

मनाचे श्लोक १६८.

करी वृत्ती जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते ।
परी सज्जना केविं बाधु शके ते ॥ १६८॥

ज्याची वृत्ती संत करते तो संत जाणा. दुराशेने जो दीन होत नाही. देहबुद्धीची उपाधी वाढवते, पण सज्जनाला ती कशी बाधेल.

- समर्थ रामदास