मनाचे श्लोक

नसे अंत आनंत संता पुसावा

मनाचे श्लोक १६९.

नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकारविस्तार हा नीरसावा ॥
गुणेवीण निर्गुण तो आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवु नाठवावा ॥ १६९॥

अंत आणि अनंत संताला पुसावा. अहंकाराचा विस्तार नीरस व्हावा. गुणांवाचून निर्गुण आठवावा. देहबुद्धीचा आठव आठवू नये.

- समर्थ रामदास