मनाचे श्लोक

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी

मनाचे श्लोक १७०.

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ॥
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे ।
म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ॥ १७०॥

ज्ञानबोधाने देहबुद्धी त्यागावी. विवेकाने त्या वस्तूची भेट घ्यावी. तदाकार वृत्ती स्वभावाने नसते. ती नेहमी शोधत जावे.

- समर्थ रामदास