स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥
मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली ।
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली ॥ १७२॥
विषयात स्फुरणारी कल्पना अविद्या आहे. ब्रह्म स्फुरले तर ती माया सुविद्या आहे. मुळची कल्पना दोन रूपे झाली. विवेकाने ती स्वस्वरूपात मिळते.
- समर्थ रामदास