स्वरुपी उदेला अहंकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥
दिशा पाहतां ते निशा वाढताहे ।
विवेके विचारे विवंचुनि पाहे ॥ १७३॥
स्वरूपात अहंकार उदयाला आला, आणि त्याने सारे व्योम आच्छादले. दिशा पाहता रात्र वाढते. विवेकाने विचार करून विवंचून पाहा.
- समर्थ रामदास