विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥
हरू जाळितो लोक संहारकाळी ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५॥
विधाता सर्वांच्या कपाळी लिहितो. त्याच्या कपाळी कोण लिहितो. हर संहारकाळी लोक जाळतो. शेवटी शंकराला कोण जाळतो.
- समर्थ रामदास