मनाचे श्लोक

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा

मनाचे श्लोक १७६.

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥
जगी देव धुंडाळिता आढळेना ।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६॥

बारा आदित्य आणि अकरा रुद्र आहेत. असंख्यातांची संख्या इंद्र कोण करणार. देव धुंडाळता आढळत नाही. मुख्य कोण आणि कसा, हे कळत नाही.

- समर्थ रामदास