मनाचे श्लोक

तुटेना फुटेना कदा देवराणा

मनाचे श्लोक १७७.

तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥
कळेना कळेना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७॥

देवराणा तुटत नाही, फुटत नाही. दीन कधी चळत नाही, ढळत नाही. डोळ्यांना कधी कळत नाही. जगात मीपणाला वसता येत नाही, दिसत नाही.

- समर्थ रामदास